सामान्यज्ञान परीक्षेचे आयोजन सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर, श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय रावेर, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, कला व विज्ञान महाविद्यालय भालोद आणि पी. ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ येथे करण्यात आले होते. या परीक्षेसाठी रावेर येथील ५१, फैजपूर येथे ४२, भालोद येथील ४९, भुसावळ येथील २८ आणि ऐनपूर येथील ७८ असे एकूण २४८ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. [ads id="ads1"]
सदर परीक्षेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये ३०७५/- अलताब युसुफ पटेल, स.व.प. महाविद्यालय, ऐनपूर, याला, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रुपये २०७५/- रोहित रमेश पाटील, पी.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ, याला तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस रुपये १५७५/- विभागून दिपक सुभाष गाढे, श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर, व रोशन उमाकांत इंगळे, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांना मिळाले. सदर परीक्षेच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. जी. आर. ढेबंरे, प्रा. वसुंधरा फेगडे, प्रा. सी. व्ही. वानखेडे आणि प्रा. किरण वारके यांचे सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्यज्ञान परीक्षेचे समन्वयक डॉ. सतिश एन. वैष्णव, प्रा. डॉ. रमेश व्ही. भोळे, डॉ. दिपक बी. पाटील, प्रा. सुनिल आर. इंगळे, डॉ. जयंत पी. नेहेते, प्रा. साईनाथ पी. उमरीवाड, प्रा. डॉ. संदीप एस. साळुंके, प्रा. संकेत आर. चौधरी, प्रा. केतन बारी यांनी परिश्रम घेतले.



