राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल नांदगाव तालुक्यातील गंगाधर येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध करण्यात आला. निषेध करण्यासाठी जमलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.[ads id="ads2"]
संसद रत्न ठरलेल्या महिलेविषयी असे वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी सर्वच महिलांचा अपमान केला आहे. या फक्त याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन चिडले जाईल असा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नांदगाव तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी यावेळी दिला.
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
यावेळी नांदगाव माजी सभापती वाय पी जाधव, समता परिषदेचे नांदगाव तालुका अध्यक्ष अशोक पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सोपान पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी नांदगाव शहर अध्यक्ष दया जुन्नरे, सरपंच सुनील खैरनार, सचिन जेजुरकर, शंकर शिंदे, संजय सोमासे, सचिन कोरडे, रिंकेश जाधव, मनोज कोरडे, माणिक बाविस्कर, डॉक्टर भरत जाधव, विकी कोरडे, नितीन देवकाते, राजू लाठे, तानसेन जगताप आदी उपस्थित होते.



