रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर शहरात (Raver City) दुकानाचे शटर उघडून तब्बल 25 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. सदर ही घटना सोमवारी दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे की शेख आरीफ शेख रऊफ (35) यांचा प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून रावेर शहरातील सावदा रोड येथे यांचे कार्यालय आहे.[ads id="ads2"]
अज्ञात चोरट्यांचा रावेर पोलिसांकडून शोध सुरू
अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे कार्यालयाचे(Office) शटर उघडून सुमारे 23 हजारांची बॅटरी व दोन हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटर (Water Motor)लांबवली. याबाबत शेख आरीफ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द रावेर पोलिस स्टेशनला (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलिस नाईक सुरेश मेढे हे करीत आहेत.


