भरधाव वाहनाच्या धडकेत कोरपावलीतील पादचाऱ्याचा मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



कोरपावली ता.यावल प्रतिनीधी (फिरोज तडवी) कोरपावली येथील शेतमजूर कामानिमित्त शेतात पाई जात असताना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने पादचाऱ्यस जोरात धडक दिल्याने गंभिर अवस्थेत जख्मी झालेल्या व्यक्तीचा उपचारा पूर्वीच मृत्यू हि दुःखद घटना सोमवारी सकाळी अकरा वर्षांच्या सुमारास घडली.[ads id="ads1"] 

अधिक वृत्त असे की, फिरोज लतीब तडवी वय ४८, हे कुटुंबासह वास्तव्यास असुन मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह चालवित होते, त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे ,सकाळच्या सुमारास पान टपरी चालवीत असताना मोल मजुरीच्या काहीं कामानिमित्त ऑटो रिक्षा ने कोरपावली गावातून शेतात जाण्यासाठी निघाला असता , कोरपावली गावाच्य काहीं अंतरावरच रस्त्यात उतरून शेताच्य दिशेने पाई चालत जात असताना यावल कडून मोगराळेच्य्य दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच १९ डी व्ही, ७२२९ या क्रमांकाच्या गाडीने धडक दिल्याने गंभिर अवस्थेत जखमी फिरोज तडवी याला तत्काळ यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.[ads id="ads2"] 

    वैद्यकिय अधिकारी यांनी औषधोपचार करून परिस्थिती गंभीर आल्याने तत्काळ जळगाव येथिल डॉ उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आल्याने भुसावळ व जळगाव रस्त्यातच प्राणज्योत मावळली, सामजिक कार्यात सहभागी होऊन तरूण वर्गाचा मन मिळून राहणारा फिरोज अचांक हिरावून गेल्याने मित्रापरीवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला , रात्री ७ वाजता दफन विधी करण्यात आला,यावल पोलिसांत रशिद लतिफ तडवी यांनी दिलेल्या खबरी वरून यावल पोलिसांत अकास्मक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहे,

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!