ऐनपूर (विनोद कोळी) : ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक व प्राध्यापाकेतर कर्मचार्यांसाठी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी समिती तर्फे आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. [ads id="ads2"]
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. पुनीत मित्तल, बँक ऑफ महाराष्ट्र, विभागीय अधिकारी, जळगाव. यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे ग्राहकांसाठी उपलब्ध असलेले वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, सोने तारण कर्ज आणि वाहन कर्ज या विषयी विस्तृत माहिती दिली. [ads id="ads1"]
श्री. प्रशांत पाटील, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, रावेर, यांनी उपस्थित सर्व प्राध्यापक व प्राध्यापाकेतर कर्मचार्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर जी. कोल्हे यांनी केले, तर आभार प्रा. साईनाथ पी. उमरीवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. सतिश एन. वैष्णव आणि अंतर्गत गुणवत्ता हमी समितीच्या सर्व सदस्यांनी तसेच श्री. मयूर रायमळे व प्रशांत चांगरे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, रावेर यांनी परिश्रम घेतले.



