यावल दि.10 (सुरेश पाटील)
यावल तहसील कार्यालयात कोणत्याही ठिकाणी माहिती अधिकाराचा फलक आणि माहिती अधिकार 2005 मधील कलम 4 अन्वये कुठेही फलक न लावल्याने आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याने यावल तहसील कार्यालयाला माहितीचा अधिकार आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची एलर्जी आहे का ? अशा प्रश्न यावल तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांना पडला आहे? जनतेच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी जळगाव आणि उपविभागीय अधिकारी फैजपूर यांनी आपले लक्ष केंद्रित करून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
माहिती अधिकाराचा अधिनियम झाल्यापासून 120 दिवसाच्या आत माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 (1) ( क ) ( ख ) व इतर कलमान्वये व तरतुदीनुसार प्रत्येक कार्यालयात दर्शनी भागावर माहिती अधिकार अंतर्गत तपशील जनतेच्या माहितीसाठी माहितीचा फलक आवश्यक आहे.[ads id="ads2"]
परंतु यावल तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांनी माहिती अधिकारातील तरतुदीनुसार कोणताही फलक लावलेला नसल्याने तहसील कार्यालयाला माहिती अधिकाराची एलर्जी आहे का ? असा प्रश्न संपूर्ण यावल तालुक्यात सर्व स्तरात उपस्थित केला जात आहे.तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास शासकीय कामाव्यतिरिक्त येणाऱ्या इतर सर्व रिकामटेकड्या व मध्यस्थी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल अशी रास्ता पेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



