रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) वनपाल अधिकारी यांना वेळोवेळी सूचना दिल्यावरही वृक्षतोड अजून थांबले नाही. तसेच. निंबोल .ऐनपूर परिसरासह कांडवेल, धामोडी. या जंगलामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. लोकांकडून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत .(वृक्षतोड करणाऱ्या दलालांच्या डोक्यावर वनपाल अधिकारी यांचा हात आहे की? त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याचा हात आहे.)असा सवाल जनसामान्य लोकांच्या मनात रुजत आहे. [ads id="ads1"]
कारण महाराष्ट्र शासनाची पूर्वीपासून संकल्पना आहे, झाडे लावा. झाडे जगवा .पण आता त्या उलट होत आहेत, सुजलाम सुफलाम मानला जाणारा रावेर तालुक्यात वृक्ष तोडणाऱ्या दलालांनी हैदोस माजविला आहेत. झाडे तोडून सपाटी करण्याच्या मार्गावर वृक्ष तोडणारे दलाल लागले आहेत. त्यामुळे पर्यावरण संपुष्टात येण्याचा फार मोठा धोका आहे. यात शंकाच नाही. [ads id="ads2"]
कारण, वेळोवेळी (वनपाल अधिकारी) यांना सूचना दिल्यावरही ते ऐकण्याच्या तयारीत नाहीत, वृक्षतोड जर का थांबली नाही तर ,याला जबाबदार (वनपाल अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी) राहतील यात शंकाच नाही. तसेच ,रावेर तालुक्यातील वृक्षतोड जर का थांबली नाही तर, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात तक्रार करण्याचे आवाहन ऐनपूर निंबोल धामोडी कांडवेल परिसरातील लोकांनी केलेले आहेत .असा संताप संतप्त नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.