भडगाव तालुक्यातील गिरड येथील लखन उर्फ विजय रमेश गायकवाड याने २५ मे २०१८ रोजी सकाळी ५ वाजच्या सुमारास अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. तसेच सुमारे तीन महिने तिच्यावर अत्याचार केला. त्याला पळवून नेण्यासासाठी संशयीत अतुल उर्फ योगेश राजू गायकवाड याने मदत केली होती. या दोघांविरुद्ध पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोस्को अंतर्गत भडगाव पोलीस ठाण्यात (Bhadgaon Police Station) गुन्हा दाखल केला होता.[ads id="ads2"]
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आनंद पटारे यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषरोप पत्र सादर केले होते. हा खटला विशेष पोस्को न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सरकारपक्षाकडून ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पीडीता, तिची आई या दोघांची साक्ष महत्वपुर्ण ठरली.
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
त्यानुसार आरोपी लखन उर्फ विजय गायकवाड याला २० वर्ष सश्रम कारावास व ४३ हजारांचा दंड ठोठावला. सरकारपक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील ऍड. चारुलता बोरसे यांनी कामकाज पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून विजय पाटील यांनी सहकार्य केले.



