थकीत विजबिलपोटी वीज खंडीत करण्याच्या बहाण्याने रावेरच्या शेतकऱ्याला दोन लाखात गंडविले ; अज्ञाताविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : थकीत वीज खंडीत करण्याच्या बहाण्याने रावेरच्या शेतकर्‍याकडील भामट्याने ओटीपी मिळवून ऑन लाईन पध्दतीने सुमारे एक लाख ९६ हजार ७५२ रुपये काढून फसवणूक (Online Fraud) केल्याची घटना गुरुवार, १ रोजी घडली. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"] 

वीज कर्मचारी असल्याचे सांगून गंडवले

विजय जीवराम महाजन हे शेतकरी (चोरवड, ता.रावेर, ह.मु.भगवती नगर, जुना सावदा रोड, रावेर) राहतात. गुरुवार, १ डिसेंबर रोजी  एका क्रमांकावरून विजय महाजन यांना अज्ञात व्यक्तीने वीज वितरण (Mahavitran) कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून कंपनीचा लोगो असलेला मेसेज पाठवून तुमचा वीजपुरवठा खंडीत केला जाईल, तुम्ही तातडीने वीज बिलाचे पैसे भरा याबाबत डेबीट कार्डद्वारे (Debit Card) ऑनलाईन पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले. यानंतर अज्ञात इसमाने ओटीपी नंबर मिळवून विजय महाजन यांच्या आयसीआयसीआय (ICICI BANK) या बँकेच्या खात्यातून एक लाख ९६ हजार ७५२ परस्पर काढत फसवणूक केली.[ads id="ads2"] 

अज्ञाताविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल

याबाबत विजय महाजन यांनी रावेर पोलिस ठाण्यात(Raver Police Station) दिलेल्या माहितीवरून माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ (डी) प्रमाणे अज्ञात व्यक्तिविरोधात रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरे करीत आहेत.

👉हेही वाचा:- Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज 

👉हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

👉हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

👉हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

👉हेही वाचा : Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!