याबाबत सविस्तर वृत्त असे की, जातेगाव येथील सुभाष पोपट पवार यांच्याकडे जातेगाव येथील स्वस्त धान्याचे दुकान क्रमांक 57 असून त्यांच्याकडे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडे असलेले स्वस्त धान्य दुकान क्रमांक 56 च्या ग्राहकांच्या तक्रारीमुळे चौकशी आणती निलंबित करण्यात आल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती व्यवस्था म्हणून सुभाष पवार यांच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक 57 च्या दुकानातून डिसेंबर 2021 पासून शासकीय आदेशानुसार जोडण्यात आले होते.[ads id="ads2"]
तेव्हापासून जातेगाव येथील जातेगाव हे गाव मोठे असल्याने व दोन्ही स्वस्त धान्य दुकानाची गर्दी होऊ नये तसेच ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून आठवड्यातील पहिले तीन दिवस तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक 56 च्या ग्राहकांना आणि गुरुवार शुक्रवार शनिवार या तीन दिवसात स्वस्त धान्य दुकान क्रमांक 57 च्या असलेल्या ग्राहकांना धान्य वितरण करण्यात येत असताना आबा राऊत या व्यक्तीने शुक्रवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान स्वतः दारूच्या नशेत त्याच्या पत्नीला सोबत घेऊन आला व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याची समजूत काढून त्यास नोव्हेंबर महिन्याचे धान्य दिले असता आबा राऊत यांनी मागील ऑक्टोबर महिन्यातील देखील धान्य पाहिजे म्हणून वाद करण्यास सुरुवात केली. त्याची खात्री व्हावी म्हणून ही पॉज मशीनवर राऊत यांच्या हाताच्या बोटाचा ठसा घेऊन मागील महिन्याचे धान्य शिल्लक नसल्याचे लक्षात आणून दिले.
मला माझे धान्य पाहिजे असं वाटत धरला व ही पॉज मशीन फेकून दिले. आणि मला धान्य दिले नाही तर माझ्या बायकोची छेडछाड केली म्हणून गुन्हा दाखल करील अशी धान्य दुकानात काम करणारे नंदू गोंधळे आणि विजय त्रिभुवन यांच्या समक्ष धमकी दिली. अशी तक्रार सुभाष पोपट पवार यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात दिल्याने 1049/2022 नुसार 505, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील घटनेचा अधिक पुढील तपास रामेश्वर गाढे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, पोलीस हवालदार मोरे, पोलीस नाईक अनिल गांगुर्डे, प्रदीप बागुल हे करत आहेत.
स्वस्त धान्य संघटने कडून निषेध
वरील घटनेचा स्वस्त धान्य दुकानदार संघटने कडून निषेध व्यक्त करण्यात आला असून विनाकारण वाद करून शिवीगाळ करून ई पॉज मशीन फोडले असल्याने आबा शिवराम राऊत या व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डोळसे पाटील नाशिक जिल्हा स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून स्वस्त धान्य दुकान संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोशल मीडियावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वरील व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून सोमवारी शिस्त मंडळ नांदगाव तहसीलदारांची भेट घेणार असल्याचे सुभाष पवार यांनी बोलताना सांगितले.



