https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

आंबेडकरी समूहाने भावनिकतेच्या राजकारणातून बाहेर पडणे काळाची गरज

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  ऍड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या राजकीय भूमिकांमुळे पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याची निरर्थक चर्चा सुरू झाली आहे.सर्व राजकीय पक्षात सर्व जाती धर्माची लोक आहेत, मात्र त्या बद्दल कुणी चकार शब्द काढत नाहीत.त्यांनी त्यांच्या जातीचा, धर्माचा एक पक्ष काढून एकत्र येऊन राजकीय भूमिका घ्यावी,अमूकच पक्षाशी युती, आघाडी करावी, असे कुणीही बोलत नाही, लिहीत नाही.[ads id="ads1"]  

 मात्र रिपब्लिकन नेत्यांनी कायम एकत्र येऊनच निवडणूक युती, आघाडी करावी, असा शहाणपना का दाखविला जातो? नेहमी आग्रह का धरण्यात येतो? एकाच घरातील मुंडे बंधू बघिनी वेग वेगळ्या पक्षात आहेत.ठाकरे बंधू यांनी दोन वेगळी पक्ष स्थापन केली आहेत.या सारखी राजकारणात अनेक उदाहरणे सांगता येतील.राजकीय दृष्ट्या यात काहीही वावगे नाही.आक्षेपार्ह नाही. [ads id="ads2"]  

राहिलं रिपब्लिकन नेत्याबद्दल : तर जो तो नेता त्याच्या कुवतीप्रमाणे राजकीय भूमिका घेत आहे, त्यांची राजकीय समज आणि उपद्रव मूल्य सगळ्यांना माहीत आहे.प्रकाश आंबेडकर वगळता इतर नेत्यांची ताकद आणि त्यांनी केलेल्या राजकीय तडजोडी सर्वांना माहीत आहेत.रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात कविता म्हणायला पाठविले आहे का?त्या पलीकडे त्यांचं काय काम आहे? प्रा.कवाडे यांचा लॉंग मार्च नंतरचा राजकीय प्रवास वादातीत आहे,कुंभारे कुणाला बळ देत आहेत,सर्वांना माहीत आहे.डॉ राजेंद्र गवई यांची राजकीय ओळख काय आहे ? आशा नेत्यांना एकत्र आणून रिपब्लिकन पक्ष खरंच बांधता येईल का? महाराष्ट्रात जी काही राजकीय ताकद आहे ती प्रकाश आंबेडकर यांचीच.ज्या नेत्यांना स्वतः चे मतदारसंघ नाहीत.साधे त्यांचे ग्रामपंचायतीत सदस्य देखील निवडून येत नाहीत, असे तीनपाट नेते एकत्र आले काय न आले काय,काय फरक पडणार आहे ?असे खरंच राजकीय नेते असू शकतात का? प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला लोकसभेत आणि विधानसभेत मिळालेली मते तरी सर्वांच्या समोर आहेत,तरीही त्यांचा प्रभाव अकोला वगळता नाही आणि रामदास आठवले यांचा मात्र महाराष्ट्र भर प्रभाव आहे,असे सांगणे म्हणजे महामूर्खपणाच नाही का? नको त्या राजकीय तडजोडी केल्याने राजकीय आत्महत्या कशी होते, याचे बसपा हे उत्तम उदाहरण आहे. तीन वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या मायावतींची गेल्या निवडणूकीत फक्त एक जागा निवडून येते,याला कुठले राजकारण म्हणावे? 

रिपब्लिकन संकल्पना कधीच मोडीत निघाली आहे,त्यामुळे त्या भोवती भावनिक फास आवळून काहीही हाती लागणार नाही, हे माहीत असताना अश्या बातम्या प्रस्थापित माध्यमातून प्रसिध्द करून आंबेडकरी समूहाला शहानपणा दाखविण्यासाठी आणि संभ्रमित करण्यासाठी पुरेशा असतात.हे आंबेडकरी समूहाला कुणी सांगावं?


✍️लेखक -दीपध्वज कोसोदे
+919423954640

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!