रावेर तालुक्यातील पूनखेडा येथे मारहाण प्रकरणी सात संशयीतांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुक्यातील पूनखेडा येथे मारहाण प्रकरणी सात संशयीतांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल

 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : शिविगाळ का करत आहे? असे विचारल्याचा राग आल्याने महिलेस मुलीला मारहाण करण्यात आल्याची घटना रावेर तालुक्यातील पूनखेडा (Punkheda Taluka Raver) येथे सोमवारी दिनांक 23 जानेवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सात संशयीतांविरोधात रावेर पोलिस स्थानकात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. [ads id="ads1"]  

तक्रारदार लिलाबाई दिलीप रायमळे (वय - 40 रा.पूनखेडा तालुका रावेर) या मुलगी सुवर्णा नितीन मोरे (रा.भुसावळ) सह ओट्यावर गप्पा करीत असताना संशयीत आरोपींनी शिविगाळ केल्याने त्याचा जाब विचारला असता आरोपींनी लिलाबाई यांना मारहाण केली व हा वाद सोडवण्यासाठी सुवर्णा आल्यानंतर तिलाही मारहाण करण्यात आली व लाकडी दांडका कपाळावर मारून जखमी करण्यात आले तसेच पोटावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जमिनीवर फेकून देण्यात आले. या घटनेत त्यांचे दोन ग्रॅमच्या मंगळसूत्राचे नुकसान झाले. [ads id="ads2"]  

सात संशयीतांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल

या प्रकरणी रायमळे यांच्या तक्रारीवरून मिराबाई किशोर रायमळे, कविता विश्वनाथ रायमळे, विश्वनाथ किशोर रायमळे, समाधान रमेश इंगळे, प्रमोद रमेश इंगळे, प्रतिभा प्रमोद इंगळे, अनिता समाधान इंगळे (सर्व रा.पूनखेडा) यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास  हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहेत.

हेही वाचा :- ऐनपुर येथे पुनर्वसन भागातील विकास कामांसाठी करणार ग्रामपंचायत सदस्य जलसमाधी आंदोलन

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!