ऐनपुर येथे पुनर्वसन भागातील विकास कामांसाठी करणार ग्रामपंचायत सदस्य जलसमाधी आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

ऐनपुर येथील पुनर्वसन हे तिनं टप्प्यात झालेले असून या झालेल्या पुनर्वसन भागात पुनर्वसन विभागा मार्फत नागरी सुविधा पुरविण्यात येत असतात गटार ,रस्ते ,विद्यूत पोल, पाइपलाइन या सुविधा पुरविण्यात येत असतात परंतु या भागात नागरिकांकडून वेळोवेळी मांगणी करुन सुध्दा पुनर्वसन विभागाने कुठलीही दखल घेतली नाही या नागरी सुविधा पुरविण्यासाठी यापूर्वी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते. [ads id="ads1"]  

   वेळोवेळी उपोषणाला बसले होते याचा पुनर्वसन विभागाने गांभीर्याने विचार केला नसून आजपर्यंत ज्या सुविधा नागरीकांना द्यायला हवे त्या मिळालेल्या नाहीत या सुविधा मिळवण्यासाठी चक्क ग्रामपंचायत सदस्य हे दिनांक २६/०१/२०२३ प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भगवती मंदिर सुस्ती किनारा तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करणार आहेत तरी पुनर्वसन विभागाने या जलसमाधी आंदोलनाची दखल घेणं गरजेचं आहे व पुनर्वसन भागात राहीलेले विकास कामे पूर्ण करावे असे निवेदन मा. पुनर्वसन अधिकारी प्रकल्प विभाग हतनुर वसाहत जळगाव यांना दिले आहे. [ads id="ads2"]  

  या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य दिपाली पाटील,रंजना कोळी, अनिता जैतकर, किशोर पाटील, प्रियंका पाटील,परविनबानो,शे सफि, पंकज पाटील, दिपाली महाजन, राजेश पाटील, वंदना महाजन, सतिष अवसरमल, अनिल जैतकर, रुपाली अवसरमल यांनी स्वाक्षरी केली आहे.

हेही वाचा:- रावेर तालुक्यातील पूनखेडा येथे मारहाण प्रकरणी सात संशयीतांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!