रावेर (विनोद हरी कोळी) रावेर येथे आज दिनांक 14 जानेवारी शनिवार रोजी सकाळी 9 वाजता रावेर येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. चंद्रकांतभाऊ पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दिप व धुप पुजा करून उपस्थितांनी अभिवादन करण्यात आले. [ads id="ads1"]
यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, बोद्धचार्य राजेंद्र अटकाळे यांनी त्रिशरण पंचशील घेतले. कार्यक्रमास कामगार नेते दिलीप कांबळे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनुसूचित जाती विभाग सचिव राजू सवर्णे,माजी नगरसेवक ऍड. योगेश गजरे, [ads id="ads2"] राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसन गाढे,प्रा. चतुर गाढे,ऍड. सुभाष धुंदले,वाहतूक निरीक्षक संदीप तायडे, रघुनाथ कोंघे,मगन अढागळे, महेश लोखंडे, राजेंद्र पानपाटील, भूषण तायडे, धनराज घेटे, यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


