कोरपावली ता .यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
गेल्या दोन वर्षांच्या कालांतराने कोरोना संसर्गजन्य आजार कार्यकाळात जमावबंदी व संचार बंदी या तून पूर्ण पने होरपळून बाहेर पडल्याने तरूण वर्गाचा उत्साह मोठ्या अपेक्षेने असून, सालाबाद प्रमाणे कोरपावली गावातील मुख्य गजबजलेल्य चौकातील हजरत पीर गैबंशह वली यांचा साक्षात दर्गा असून सर्व धर्मिय लोक बाबांच्या यात्रे निमित्त एकत्रीत येऊन संदल शरीफ व कववलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. [ads id="ads1"] कव्वाल--- हबीब अजमेरी , फांकार,, अजमेर, कव्वलन---- परवीन तबस्सून टिव्ही शिगार,,,--- औरंगाबाद यांचा जंगी मुकाबला अतिशय आनंदी वातावरणात हिंदू मुस्लीम बांधवांनी एकत्रित येऊन कव्वाली चा आनंद लुटला कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली, जवळचं असलेल्या महेलखेडी गावात भीमा नामा अंजळेकर यांच्या लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले होते, [ads id="ads2"] गावात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून या कार्यक्रमात यावल पोलिस निरीक्षक राकेश माणगाव कर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिगाव ओपीचे साहाय्यक फौजदार देवरे दादा, व त्यांचे सहकारी पो कॉ अनिल साळुंके, पो , कॉ. भुषण चव्हान , होमगार्ड जनार्दन, पोलिस पाटील सलिम तडवी, तडवी हिंदू मुस्लिम यंगबॉईज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम शांततेत पार पडला.


