जळगाव जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यावल तालुक्यात आल्याने अनेक ठेकेदार,मध्यस्थी दलाल गायब.पं.स.आवारात 4 चाकी वाहनांची गर्दी.
यावल (सुरेश पाटील) जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आज दि.11 रोजी सकाळी11 वाजेच्या दरम्यान यावल तालुक्यात ग्रामपंचायत व जिल्हा परिषद काही शाळांमधील अडीअडचणी संदर्भात चौकशीकामी आले असता तसेच यावल पंचायत समिती कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक असल्याने यावल पंचायत समिती आवारात रोज गर्दी करणारे [ads id="ads1"] यावल रावेर तालुक्यातील काही ठराविक ठेकेदार आणि त्यांचे मध्यस्थी दलाल गायब झाल्याचे चित्र दिसुन आल्याने तसेच पंचायत समिती आवारात अनेक ग्रामसेवकांच्या व इतर महागड्या चार चाकी वाहने मोठ्या संख्येने पार्किंग झाल्याने यावल तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत भविष्यात पंचायत समिती आवारात चार चाकी वाहनांसाठी खास पर्यायी व्यवस्था शासनाला करावी लागणार असल्याचे यावल तालुका संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहेत. [ads id="ads2"]
यावल पंचायत समिती आवारात आणि कार्यालयात दररोज यावल तालुक्यातील ठराविक मध्यस्थी दलाल आणि काही बोगस ठेकेदार गर्दी करून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असणारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तसेच यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी सौ मंजुश्री गायकवाड यांनी कडक बंदोबस्त करावा असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.


