ऐनपूर (विनोद हरी कोळी) : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकका तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे एक दिवसीय शिबीर दत्तक वस्ती बलवाडी येथील जि. प. मराठी शाळेत संपन्न झाले. सदर कार्यक्रमाच्या उद्घटनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. महाजन हे होते. [ads id="ads1"]
मा. उपसरपंच श्री. संजय वाघ यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बलवाडी येथील प्रगतिशील शेतकरी तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. संतोष महाजन, बलवाडीचे ग्रामसेवक श्री. प्रकाश तायडे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रभाकर पाटील, श्री. ज्ञानेश्वर पाटील हे उपस्थित होते. [ads id="ads2"]
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व सरदार पटेलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री. संतोष महाजन यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले व अश्या शिबिरांमधून विद्यार्थ्यांचे सामाजिक प्रबोधन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. पी. आर. महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात एक दिवसीय शिबिराचे महत्व सांगितले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे संस्कारांची शाळा होय असेही ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळी उदाहरणे देऊन संस्कार कसे घडतात याविषयी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात प्रा. डॉ. जे. पी. नेहेते यांनी स्वयंसेवकांना “रासेयो स्वयंसेवक व स्वच्छता अभियान” या विषयावर तर माजी विद्यार्थिनी अपेक्षा पाटील व तेजल चौधरी यांनी सायबर सेक्युरिटी याविषयी मार्गदर्शन केले. नंतर बलवाडी येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी अल्ताफ पटेल यांनी तर प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. बी. पाटील यांनी यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पाटील, श्री. गोपाळ महाजन, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. तसेच जि.प. मराठी शाळा बलवाडी येथील शिक्षक आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.


