ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रुजु झालेले डॉ कुणाल पाटील याचा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीयरेंम्भोटा येथील जेष्ठ शिवसैनिक छोटूदादा पाटील, व शिवसैनिक यानी सत्कार केला. [ads id="ads1"]
यावेळी ऐनपूर ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर, विनोद पाटील खिर्डी, भैया पाटील वाघाडी, तुषार कचरे ऐनपूर, सुभाष महाजन रेम्भोटा, राहुल महाजन, निशिकांत पाटील, पवन कचरे, दीपक कोळी, वैभव चौधरी, बादशहा जैतकर, यांच्यासह पत्रकार बंधू व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी वर्ग आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. [ads id="ads2"]
यावेळी छोटु पाटील यांनीडॉ कुणाल पाटील यांच्यासोबत चर्चे दरम्यान तुम्हाला काही अडचणी असतील, काही मागण्या असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहचवा आम्ही त्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत असे छोटूदादा यांनी आश्वस्त केले.
तसेच ऐनपूर येथे जेष्ठ शिवसैनिक छोटूदादा पाटील यांनी सुरेश महाजन ( फोटोग्राफर ) यांच्याकडे व मिलिंद अवसरमल यांच्या कडे द्वारदर्शन पर भेट दिली.



