रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)
माजी राज्यमंत्री माननीय, बच्चुभाऊ कडू ,यांच्या आदेशाने तसेच ,प्रहार संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री ;अनिल भाऊ चौधरी, यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील, यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक 10 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल साहेब, यांना नवीन पदभार सांभाळल्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका तर्फे शुभेच्छा देण्यात आली. [ads id="ads1"]
त्यानंतर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोळी. तसेच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अमन मित्तल साहेब ,यांना दिव्यांग बांधवांच्या विविध विषयांवर निवेदन देण्यात आले .रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना सन 2016 च्या जीआर नुसार 90% ग्रामपंचायत ने त्यांच्या हक्काचा पाच टक्के निधी अजून पर्यंत दिलेला नाहीत तसेच दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी 200 स्क्वेअर फुट, जागा जीआर असल्यावर ग्रामसेवक जागा उपलब्ध करून देत नाहीत. अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. वरील विषयांवर लवकरात लवकर निर्णय लागू असे आश्वास न जिल्हाधिकारी अमन मित्तल साहेब यांनी दिले. [ads id="ads2"]
त्याबद्दल प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले .त्या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी प्रहार दिव्यांग संघटना रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोळी. दिव्यांग तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील, दिव्यांग तालुका सचिव भागवत शेलोळे, दिव्यांग तालुका संघटक आनंदा कोळी, दिव्यांग तालुका सहसचिव संतोष कोळी, दिव्यांग शाखाप्रमुख गोपाल कोळी, इत्यादी रावेर तालुक्यातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पदाधिकारी यांची उपस्थिती होती.



.jpg)