रावेर तालुका प्रतिनीधी ( विनोद हरी कोळी) रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदिरात सप्तरंग २०२३ हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दिनांक ९ जानेवारी २०२३ सोमवार रोजी उत्साहात झाला. [ads id="ads1"]
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील हे होते. उद्घाटक रावेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.शैलेश देखने साहेब यांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून केले.तसेच मंचावर उपस्थित प्रमुख संस्थेचे चेअरमन श्रीराम पाटील,उपाध्यक्ष रामदास महाजन,सचिव संजय पाटील,केंद्रप्रमुख गणेश धाडे तसेच संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी यांनी शाळेचे प्रेरणास्थान असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. [ads id="ads2"]
प्रास्ताविक मुख्याध्यापक शुभम महाजन सर यांनी तर स्वागत व्यवस्थापक आर.टी.महाजन सर यांनी केले.तसेच संस्थेचे संचालक तथा बलवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.व्ही.पाटील सर यांना सकाळ वृत्तपत्र समुहातर्फे नाशिक येथे सकाळ एक्सलन्स अवार्ड २०२२ मिळाल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.व त्यांनी कार्यक्रमास उपस्थिताना मार्गदर्शन केले.
चिमुकल्याणी देवा श्रीगणेशा,लावणी,कोरोना थिम,प्यारे वतन,एज्यूकेशन थिम, गरबा ,अंताक्षरी,राजस्थानी नृत्यासह २१ कार्यक्रम सादर केले.संचालक,पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांना भरभरून बक्षिसे दिली.सूत्रसंचलन श्रीमती.निकिता चौधरी व आरती पाटील यांनी तर आभार अश्विनी चौधरी यांनी मानले.यशस्वीतेसाठी अक्षय पाटील,कल्याणी शिंदे ,योगिता शिवरामे यांनी परिश्रम घेतले.




