रुईखेडा येथे वसुलीच्या कामात अडथळा : एका इसमावर गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


मुक्ताईनगर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) तालुक्यातील रुईखेडा ग्रा प कडून कर वसूलीची धडक कारवाई सुरू आहे.तीन चार दिवसापासून थकबाकीदार यांचे नळ कनेक्शन तोडणेची कारवाई ग्रा प कडून करण्यात येत आहे.  [ads id="ads1"]  

परवा रामगिर गोसावी याच्या कडील थकबाकी वसुली करण्यासाठी पथक घरी धडकल्याचा राग मनात ठेवून रात्री रामगिर गोसावी याने दारूच्या नशेत ग्रा प च्या कर वसुली पथकास व ग्रा प च्या पदाधिकऱ्याना बेछूट शिवीगाळ केल्याने आज सरपंच सौ उषा अजय गुरचळ यांच्या फिर्यादी वरून रामगिर कडूगिर गोसावी याच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात भा द वी ५०४ ,५०६ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [ads id="ads2"]  

ग्रा प ची कर वसुलीची कारवाई या पुढे देखील सुरूच राहणार असून, ग्रा प कर वसुलीच्या कामात अडथळा आणणाऱ्या इसमाविरुद्ध ग्रा प मार्फत गुन्हे दाखल केले जातील, अशी प्रतिक्रिया सरपंच सौ उषा अजय गुरचळ आणि ग्राम विकास अधिकारी दीपक कोसोदे यांनी माध्यमांना दिली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!