कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. डी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख वक्ते प्रा.प्रदिप तायडे यांनी आपल्या व्याख्यानात स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांंच्या जीवनचरीत्रावरती प्रकाश टाकला.तसेच स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेला उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्ती पर्यंत थांबू नका",हा संदेश जर प्रत्येक तरूणाने आत्मसात केला तर नक्कीच ते आपल्या जीवनात यशस्वी होतील असे मत मांडले. प्रा.नरेंद्र मुळे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची महती विषद केली. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जिजाऊंनी घडवला. राजमाता जिजाऊनीं आपल्या दूरदृष्टीतून समाजाला जनतेचा राजा दिला. [ads id="ads2"]
तसेच अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी राष्ट्रीय युवा दिनाची पार्श्वभूमी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. यो. विद्यार्थी प्रतिनिधी अल्ताब पटेल यांनी तर प्रा. संकेत चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील, प्रा. व्ही. एच. पाटील, तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


