रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)
माजी राज्यमंत्री, माननीय बच्चुभाऊ .यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच ,प्रहार संघटनाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी. प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील. यांच्या मार्गदर्शनाने काल दिनांक 10 जानेवारी रोजी जळगाव येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुकाध्यक्ष, विनोद कोळी आणि पदाधिकारी यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अंत्योदय कार्ड विषयी निवेदन देण्यात आले. [ads id="ads1"]
सन 2013 च्या जीआर नुसार अंत्योदय कार्ड पासून भरपूर दिव्यांग बांधव वंचित आहेत त्यांना त्वरित अंत्योदय कार्ड तालुकास्तरावरून वितरित करण्यात यावे, तसेच अंत्योदयिष्टांक वाढवून मिळण्याबाबत अशी चर्चा रावेर तालुक्यातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी करण्यात आली .तसेच रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी आम्ही त्वरित अंत्योदय इष्टांक उपलब्ध करून देऊ असे आश्वासन जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबांनी दिली. त्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आभार व्यक्त केले. [ads id="ads2"]
त्याप्रसंगी उपस्थिती प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका अध्यक्ष ,विनोद कोळी. दिव्यांग तालुका उपाध्यक्ष, शशिकांत पाटील. दिव्यांग तालुका संघटक ,आनंदा कोळी. दिव्यांग तालुका सचिव, भागवत शेलोळे .दिव्यांग तालुका सहसचिव ,संतोष कोळी. दिव्यांग शाखा अध्यक्ष ,गोपाल कोळी. इत्यादी पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते.


