सामाजिक भान ठेवून उद्रेकाने नव्हे संयमाने पारदर्शक पत्रकारिता करा ; रावेरच्या पुरस्कार सोहळ्यात वासुदेव नरवाडे यांचे प्रतिपादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
सामाजिक भान ठेवून उद्रेकाने नव्हे संयमाने पारदर्शक पत्रकारिता करा  ; रावेरच्या पुरस्कार सोहळ्यात वासुदेव नरवाडे यांचे प्रतिपादन

रावेर (समाधान गाढे) सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पत्रकारांनी द्वेषाने, उद्रेकाने नव्हे संयमाने पारदर्शक तसेच समाजाला प्रेरणा देणारी पत्रकारिता करावी. असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देतांना ज्येष्ठ पत्रकार वासुदेव नरवाडे हे "दर्पण पत्रकार फौंडेशन" च्यावतीने आयोजित "उत्कृष्ठ पत्रकार"पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. [ads id="ads1"]  

          रावेर दर्पण पत्रकार फौंडेशनतर्फे आयोजित उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार (सन२०२२ -२३ ) सोहळा कार्यक्रमाचे प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन प्रांताधिकारी कैलास कडलग, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ कुणाल सोनवणे,सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता चंदशेखर चोपडेकर, विद्युत मंडळाचे सहाय्यक अभियंता अनिल पाटील , प्रशिक्षित तहसिलदार मयुर कळसे , पोलिस निरीक्षक बबनराव आव्हाड यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप वैदय यांनी केले. प्रांताधिकारी कैलास कडलग , पोलीस उपनिभागीय अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांचे हस्ते तालुका स्तरावरील "उत्कृष्ठ पत्रकार "म्हणून दिव्य मराठीचे वासुदेव नरवाडे यांना स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. [ads id="ads2"]  

या सोबत ग्रामीण भागात काम करणारे पाच वार्ताहरांचा सन्मांन करतांना देशदूतचे वार्ताहर लाला कोष्टी ( सावदा ), लोकमतचे वार्ताहर रमेश पाटील ( केऱ्हाळे ), पुण्यनगरीचे वार्ताहर अनिल आसेकर ( ऐनपुर) ,सकाळचे वार्ताहर मिलींद टोके ( चिनावल ), दिव्य मराठीचे वार्ताहर संजय पाटील (तांदळवाडी) तसेच इलेक्ट्रॉनिक मेडीया झी बिझिनेसच्या निवेदिका कु.भावना चंदनानी यांना उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार हा स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र स्वरुपात देवून मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. प्रांताधिकारी कैलास कडलग, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, कु भावना चंदनानी,अनिल आसेकर यांनी मनोगत व्यक्त केले.


         कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार अरूण पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी जिप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिवसेनेचे नेते प्रल्हाद महाजन, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष योगीराज पाटील शिवसेना जिल्हा संघटक रविंद्र पवार, राष्ट्रवादीचे सोपान पाटील, भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, डॉ सुरेश पाटील , विनोद पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गणवानी, विनायक महाजन, माजी प स सदस्या सौ योगिता वानखेडे ,डी डी वाणी , यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. सुत्र संचलन चंदकांत विचवे यांनी तर आभार प्रकाश पाटील यांनी मानले.

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील उपसरपंच यांना तात्काळ अपात्र करण्याची निवेदनाव्दारे मागणी ; उपसरपंच पती वारंवार ग्राम पंचायतीमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा केला आरोप

हेही वाचा :- भारतीय सनदी अधिकाऱ्यांचे ऑडिट झाले पाहिजे - ई.झेड. खोब्रागडे 

    रावेर दर्पण पत्रकार फौंडेशन पुरस्कार यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रकाश पाटील , दिलीप वैदय , चंद्रकांत विचवे , कुमार नरवाडे , रवि महाजन, सुनिल चौधरी , बंडू पाटील , गणेश शेट्टी , युसुफ खाटीक , संजय मानकर ,यासह पत्रकारांनी परीश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!