रेणूकाला ग्राम सुधारणा मंडळ व साळवे हायस्कूलने घेतले दत्तक..
धरणगाव (सुधाकर मोरे सर) साळवे इंग्रजी विद्यालयातील नवनियुक्त मुख्याध्यापक ए एस पाटील सर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. भारतमातेचे पूजन स्कूल कमेटी चेअरमन डॉ. शशिकांत नारखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. पूज्य सानेगुरुजींच्या स्मारकाचे पूजन संस्थेचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे यांच्या हस्ते करण्यात आले व सरस्वती मातेच्या स्मारकाचे पूजन उपाध्यक्ष जी एन पाटील सर व सचिव डॉ चंद्रकांत नारखेडे यांच्या हस्ते माल्ल्यार्पण करण्यात आले. [ads id="ads1"]
नंतर संविधान प्रास्ताविकेचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले. सना पटेल व इशांत ढाके या विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त सुंदर भाषण दिले. नंतर वि का सोसायटी येथे चेअरमन किशोर ब-हाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गावातून शोभायात्रा काढून झेंडा चौकात शासकीय ध्वजारोहण जेष्ठ नागरिक निव्रूत्त शिक्षक बाबूराव पाटील गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर आंतरशालेय विभागीय कुस्ती स्पर्धेत विजयी झालेली व सुवर्णपदकासह विशेष प्रावीण्य प्राप्त करणारी ई. बारावी ची विद्यार्थ्यांनी रेणुका रामकृष्ण महाजन हिचा ग्रामपंचायतीतर्फे भव्य नागरीसत्कार करण्यात आला. [ads id="ads2"]
सरपंच ईशाताई बोरोले, उपसरपंच सतिष पवार व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी नरेंद्र चौधरी यांच्या हस्ते भव्यदिव्य नागरीसत्कार करण्यात आला. १००१/-रूपये बक्षीस देण्यात आले.कर्तव्य बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी यांनी ज्योती बा फुले-सावित्रीबाई फुले यांचा फोटो फ्रेम देऊन सत्कार केला, स्व.दगडूशेठ चोपडा स्मरमणार्थ चोपडा परिवारातर्फे ५०१/-रूपये बक्षीस देण्यात आले.
हेही वाचा :- ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून रंगेहाथ अटक : जळगाव जिल्ह्यातील घटना
नंतर सानेगुरुजी सेमी प्राथमिक विद्यालय, साळवे इंग्रजी विद्यालय व जि प मुला- मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण, देशभक्तीपर गीते व अंधशश्नध्देवर आधारित नाट्यछटा सादरीकरण केले. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना भरघोस प्रतिसाद दिला व बक्षिसे दिले. नंतर सुवर्णकन्या रेणुका महाजन ला ग्रामसुधारणा मंडळ व साळवे हायस्कूलच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांनी दत्तक घेऊन तिला उच्च शिक्षण व पुढील स्पर्धा खेळण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मदत केली जाईल असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस डी मोरे यांनी केल.आभार प्रदर्शन मुख्याध्यापक ए एस पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक बी आर बोरोले, व्ही एस कांयदे. सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ रंजना नेहेते, गुणवंती पाटील, प्रतिभा पाटील आणि नीता पाटील यांनी व एस पी तायडे, एस व्ही राठोड, व्ही के मोरे यांंनी आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.



