🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
📣 विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी - दहावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट 6 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
📣 दिल्लीच्या आग्रा किल्ल्यात शिवजयंती सोहळा साजरा करण्याची परवानगी पुरातत्व खात्याने नाकारली आणि त्यामुळे संतप्त मराठा समाजाकडून औरंगाबाद येथे केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
📣 MPSC विरोधात विद्यार्थ्यांचे मुंडन आंदोलन, नगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे 8 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे.
[ads id="ads1"]
📣 भाजपच्या रणजित पाटलांना मोठा धक्का, अमरावती पदवीधरमध्ये धीरज लिंगाडेंचा विजय, तब्बल 30 तास मतमोजणी सुरु होती.
📣 Bloomberg Billionaires Index च्या माहितीनुसार, गौतम अदानींच्या नेटवर्थमध्ये झालेल्या पडझडीमुळे ते आता श्रीमंतांच्या यादीत थेट २१ व्या स्थानावर पोहोचले आहेत.
📣 शिक्षण मंडळाची मोठी घोषणा - दहावी बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड केल्यास, विद्यार्थ्यांना पाच वर्षे परीक्षेला बसता येणार नाही.
📣 मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारी सेवेत भरती झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने जीआर काढून EWS वर्गातून नोकरी दिली होती
[ads id="ads2"]
▪️30 तासांनंतर अमरावती पदवीधरचा निकाल जाहीर: 'मविआ'चे धीरज लिंगाडे विजयी, फडणवीसांचे निकटवर्तीय रणजित पाटील पराभूत
▪️सत्यजित तांबे यांचे लेकीकडून कौतुक: अहिल्या म्हणाली - बाबांचा खूप अभिमान वाटतो, तेच माझे 'रिअल' सुपरहिरो
▪️'हेट स्पीच' होणार नाहीत, याची काळजी घ्या: हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र शासनाला निर्देश
▪️चपळगावकरांनी साहित्य संमेलनात सुनावले खडेबोल: साहित्याचा संसार सरकारी नियंत्रणात न जाण्याचे भान साहित्यिकांनी राखावे
▪️संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब: लोकसभेत विरोधकांचा तीव्र गदारोळ; JPC चौकशीच्या मागणीसाठी नारेबाजी
▪️सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक धक्का: अमूलने फुल क्रीम दुधाच्या दरात लिटरमागे केली 3 रुपयांनी वाढ
▪️भारतासोबत इनोव्हेशन ब्रिज करार: चीनला टक्कर देण्यासाठी भारताची मदत करू इच्छिते अमेरिका
▪️अदानी वादात हरियाणाचे IAS खेमका यांची एंट्री: हिंडेनबर्गच्या अहवालावर म्हणाले- हे नुकसान जनतेलाच सहन करावे लागेल
▪️दीपक चहरच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी: 10 लाखांच्या फसवणुकीचा आरोप, धमकावणारा क्रिकेट संघटनेचा माजी पदाधिकारी
▪️शाहीन झाला आफ्रिदीचा जावई: कराचीत पार पडला शाहीन आणि अंशा यांचा निकाह
▪️'खेला इंडीया'त महाराष्ट्राचे पदकतालिकेत अव्वलस्थान कायम: खो- खो मध्ये वर्चस्वाला धक्का, योगासनात MPचे कडवे आव्हान
▪️हेलनशी दुसऱ्या लग्नाबद्दल सलीम खान यांनी सोडले मौन: म्हणाले - 'माझा हेतू कधीच चुकीचा नव्हता', अरबाज खानच्या शोमध्ये झाले व्यक्त
▪️सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी राजस्थानात पोहोचली मेंदी आर्टिस्ट: भावी सुनेसाठी सिद्धार्थच्या कुटुंबीयांची खास प्लानिंग


