नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील जातेगाव येथील अनिता आनंदा लाठे ही महिला आज दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारी शेतामध्ये मजुरीने शेतात कामासाठी दिली असता. त्या ठिकाणी सर्पदंश झाल्याने घाबरून गेली आणि तिची तब्येत जास्त झाली. त्यामुळे सदर महिलेला जवळच असलेल्या बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी देण्यात आले.[ads id="ads1"]
परंतु बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या ठिकाणी तिच्यावर उपचार केल्यानंतर मालेगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदर माहिती तब्येत जास्त असल्याचे समजते.[ads id="ads2"]
याबाबत जातेगाव येथील सर्पमित्र रामेश्वर सोनवणे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ज्यावेळेस सरपंच झाला त्यावेळी मी त्या ठिकाणी नव्हतो. परंतु सदर सापाचा फोटो मला पाठवण्यात आल्यानंतर तो साप मांजर या जातीचा असून विषारी नाही. असे सांगितले.
अनिता आनंदा लाटे या महिलेला दोन मुले एक मुलगा आहे. सदर महिलेला सर्पदंश झाल्याने सदर महिला घाबरली गेली असून तिची तब्येत गंभीर जरी असली तरी देखील तिला काही होणार नाही अशी चर्चा जातेगावमध्ये सुरू आहे.


