रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर पंचायत समितीतील (Panchayat Samiti Raver) शौचालयाच्या भ्रष्टाचार प्रकरणातील अटकेतील असलेले संशयित आरोपी लेखाधिकारी लक्ष्मण पाटील आणि समाधान निंभोरे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला आहे. त्यामुळे आता दोघांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.[ads id="ads1"]
रावेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला रावेर पंचायत समितीचा (Panchayat Samiti Raver) बहुचर्चित शौचालय घोटाळा या प्रकरणावर एक महत्वाची माहिती रावेर पोलिसांकडून (Raver Police) समोर येत आहे. ती म्हणजे या शोचालय घोटाळ्यातील मुख्य आरोपी समाधान निंभोरे तसेच रावेर पंचायत समितीचे(Panchayat Samiti Raver) लेखाधिकारी लक्ष्मण पाटील यांनी भुसावळ कोर्टामध्ये जामीनासाठी अर्ज केला होता. [ads id="ads2"]
परंतु त्यांचा जामीन अर्ज भुसावळ न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला आहे. रावेर पोलिसांनी आतापर्यंत ६८ लाख रुपये शौचालय घोटाळ्या बाजांकडून वसुल करण्यात आले आहे. लवकरच बाकीच्या आरोपींची अटकसत्र राबविले जाईल असे तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांनी बोलतांना सांगितले.
हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार
हेही वाचा :- अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत ! येथून करता येणार अर्ज
हेही वाचा:- सावदा येथील बस स्टँडवरून तरुणीच्या हातातून पर्स लांबवली : आरोपीला केली सावदा पोलिसांनी अटक