यावल (सुरेश पाटील)
बुधवार दि.22 रोजी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच दंत तपासणी करण्यात आली.तपासणी दरम्यान RBSK(राष्ट्रीय बाल स्वास्थ्य )पथकातील यावल येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ.वैशाली निकुंभ,डॉ.मोहनीष भोपे,औषधनिर्माता डॉ.उमेश येवले तसेच आरोग्यसेविका डॉ.उषा बार्हे उपस्थित होते.[ads id="ads1"]
इयत्ता नर्सरी पासून ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची दंत तपासणी तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली . तपासणी दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम,प्रशांत फेगडे सर तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .