पाणीपुरवठा करणारी नवीन पाईपलाईन फुटली ; नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे,गैरप्रकारामुळे आणि लोकप्रतिनिधी गप्प बसल्याने यावलकरांचे नशीब फुटले...?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल शहरात जोरदार चर्चा

यावल  ( सुरेश पाटील) नगरपरिषदेने सन 2021- 22 मध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून विकसित भागात नवीन पाण्याची टाकी बांधून पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन टाकली होती आणि आहे, मी नवीन पाईपलाईन गेल्या दोन दिवसापासून भास्कर नगर मध्ये लिक झाल्याने पाणी रस्त्यावर वाहत आहे. [ads id="ads1"]  

   ही विकास कामे करताना ठेकेदाराच्या आणि नगरपालिकेच्या टक्केवारीमुळे नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे न झाल्याने विकसित भागात पाणीपुरवठा करताना मोठा अडथळा निर्माण होत असून भास्करनगर व इतर विकसित भागात पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अनियमित होत असल्याने नागरिकांनमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. [ads id="ads2"]  

     पाण्याचा नवीन साठवण तलाव आणि विकसित भागात नवीन पाण्याची पाईपलाईन टाकताना जो गैरप्रकार झाला आहे त्याबाबत तक्रार केल्यानुसार चौकशी प्रलंबित आहे.भास्करनगर मध्ये गेल्या दोन दिवसापासून पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया जात आहे.नगरपालिकेत सध्या प्रशासक राजवट आणि प्रभारी मुख्याधिकारी असल्याने यावल नगरपालिकेतील लहान मोठी व दैनंदिन कामे संबंधित ठेकेदार आणि संबंधित नगरपालिकेतील कर्मचारी विभाग प्रमुख आपल्या सोयीनुसार करीत आहेत.

हेही वाचा :- रेल्वेच्या धडकेत निंभोरा येथील युवकाचा मृत्यू : निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

 या सर्व प्रकाराकडे यावल शहरातील विविध सामाजिक काही संघटना,लोकप्रतिनिधी, सत्ताधारी आणि विरोधक गप्प बसून असल्याने यावलकरांचे नशीब सुद्धा पाईप लाईन सोबत फुटल्याची जोरदार चर्चा यावल शहरात आहे.याकडे जिल्हाधिकारी जळगाव नगरपालिका विभाग प्रमुख,प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी यावल नगरपालिकेच्या प्रलंबित सर्व तक्रारीची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!