यावल तालुक्यात तापी नदी पुलाजवळ भुसावळ-यावल रोडला लागून असलेल्या अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.[ads id="ads1"]
पोदार इंटरनॅशनल स्कूल अकलूद शाळेत विज्ञान प्रदर्शन दि.28 रोजी सर सी.व्ही.रमण यांच्या भारतीय विज्ञान दिवस अंतर्गत पोदार इंटरनॅशनल स्कूल व पोदार प्रेपच्या अकलुद शाळेचे चिमुकल्या विद्यार्थांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला. या विज्ञान प्रदर्शनात एकूण 220 विज्ञानाच्या प्रतिकृती आणि त्यावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थांनी प्रत्यक्ष उपस्थित मान्यवरांना करून दाखविले.[ads id="ads2"]
हेही वाचा:- मुक बधीर महिलेचे वारसाचा शोध होण्यास जळगाव पोलसांकडून जनतेला आवाहन
हेही वाचा:-रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी नग्नावस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ
हेही वाचा:- निंभोरा पोलिसात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जामीन मंजूर
ड्रोन,मल्टी अग्रीकल्चर,ड्रीप इरिगेशन,सोलर सिटी,नॉन न्यूटीनिअन फ्लूईड,वॉटर हार्वेस्टिंग,विंड मिल, डायग्नोस्टिक सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम,चंद्राच्या कला,प्रकाश संलेषण प्रक्रिया अश्या प्रतीकृती तयार करून पोदार प्रेप आणि पोदार शाळेच्या विद्यार्थांनी उपस्थितांसमोर प्रस्तुत केल्या.कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सर सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार चढवून करण्यात आले. शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल शाह यांनी मान्यवरांचे बुके व बॅचेस देऊन स्वागत केले.मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ धनके गट शिक्षण अधिकारी,पंचायत समिती यावल,यांनी विद्यार्थांना ‘ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे’ कसे घ्यावेत याबाबत मार्गदर्शन केले.विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण डॉ.राजेंद्र फिरके,डॉ.मकरंद चांदवडकर,डॉ.मोनिका अग्रवाल,डॉ.हेमंत अग्रवाल, डॉ.दीप्ती चौधरी,डॉ.स्वाती गाजरे,डॉ.वृषाली चौधरी,डॉ. प्रमोद चौधरी,कॅप्टन राजेंद्र राजपूत यांनी केले. कार्यक्रमाला यावल येथील पत्रकार तेजस यावलकर उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमातच शाळेचे तीन विद्यार्थी ए.एच.एस.आश्विन,ओम धालपे,आर्यमन गाजरे यांनी आर्यभट्ट गणित चॅलेन्ज या परीक्षेत सुमारे १०० विद्यार्थांमधून यश संपादन करत पुणे रिजन मधून त्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली आहे.त्यांना प्राचार्यांच्या हस्ते प्रमाण पत्र देवून त्यांचे कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्रशासकीय अधिकारी रामदास कुलकर्णी,पोदार प्रेपचे मुख्याधापिका श्रीमती मनीषा शृंगी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.


