दहाव्याच्या दिवशी जी.एस.नगरमध्ये १० वृक्षांची लागवड व १० महामातांचे अनमोल ग्रंथ भेट !...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 सुधाकर मोरे यांनी आईच्या देहदानाचा घेतला क्रांतिकारक निर्णय !....

धरणगाव प्रतिनिधी 

धरणगांव - जी एस नगर येथील रहिवासी तसेच साळवा माध्यमिक विद्यालय येथील उपक्रमशिल शिक्षक सुधाकर दामोदर मोरे यांनी आईच्या निधनानंतर पारंपारिक परंपरा मोडत आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आईच्या मृत्युनंतर देहदानाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक कटूगोड समस्या, अडचणी, विचार आणि समजूतींना तोंड देत भाऊबहिणींना समजावून, समाजविघातक प्रवृत्तीना तोंड देत संकल्प पूर्ण केला. [ads id="ads1"]  

  आईचे मृत शरीर गोदावरी हॉस्पिटल जळगाव येथे प्रशिक्षण घेण्याऱ्या डॉक्टर मुला - मुलींना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिले. मोरे यांनी आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी अर्धागिंणी, मुलगा व मुलीने कोणत्याही प्रकारचा कंटाळा, हेवादावा किंवा व्देष न करता आईच्या ९१ व्या वयापर्यंत तत्पर सेवा केली. त्यामुळे मला व कुटुंबाला कोणत्याही प्रकारचे दुःख झाले नाही.[ads id="ads2"]  

           समाजातील परंपरागत दारावर येणाऱ्या आप्तेष्टांना, स्नेहीजनांना आईचे कर्तृत्व, इतिहास रडून न सांगता व्यवस्थित गप्पा-गोष्टींच्या माध्यमातून दहाव्या पर्यंत चर्चेत सांगितले. शिवराय - फुले - शाहू आंबेडकर या महामानवांचे विचार आत्मसात करून दशक्रिया विधी व गंधमुक्तीच्या दिवशी १० पित्तर महिला भगिणींना राजमाता, राष्ट्रमाता, महामातांच्या जिवनचरित्रावरील कर्तबगारीचे ग्रंथ भेट दिले व दशव्यानिमित्त आईच्या स्मरणार्थ जी.एस.नगर कॉलनीतील ओपनस्पेस मध्ये १० वृक्षाची लागवड पित्तर महीला भगिनींच्या शुभहस्ते करण्यात आली. यामध्ये लिंब, पिंपळ, चिंच अशा वृक्षांचा समावेश आहे.

             मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत परिसरात एक परिवर्तनवादी विचार स्वतः कृतीतुन दिला याचे कॉलनी परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!