नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील मौजे वसंत नगर येथील जल जीवन मिशन योजनेचे केलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून या झालेल्या कामाची चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते जाबीर शेख व कडूबा महाले यांनी नांदगाव पंचायत समिती कार्यालयासह कॉलिटी कंट्रोल विभागाला सादर केले होते.[ads id="ads1"]
परंतु सादर केलेल्या निवेदनाची अद्याप कोणतीही दखल प्रशासन स्तरावरून केली गेली नसल्याने सदर कामाची तात्काळ सखोल चौकशी करावी अन्यथा दिनांक 28 मार्च 2023 पासून जातेगाव येथील ग्रामपालिका समोर उपोषणास सुरुवात करण्यात येणार असल्याचे सदर निवेदनामध्ये नमूद केली असून प्रत्यक्षात उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.


