यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या एका ग्रामसेवकास ग्रामपंचायत सदस्याने शिवीगाळ व मारहाण करीत धमकावल्या प्रकरणी फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात त्या सदस्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . [ads id="ads1"] या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार प्रविण बळीराम कोळी वय३८ वर्ष राहणार भुसावळ हे यावल पंचायत समिती अतर्गत येणाऱ्या कासवा या अकलूद कठोरा दुसखेडा या गावांची ग्रुप ग्रामपंचायत असुन या ठीकाणी ग्रामसेवक म्हणुन मागील १ वर्षापासुन कार्यरत असुन , दिनांक २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रविण कोळी हे कासवा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आपल्या कार्यालयातील कर्मचारी भगवान पंढरीनाथ कोळी आणि कारकुन संतोष रामचंद्र सपकाळे असे सेवेत कार्यरत असतांना गावातील ग्राम पंचायत सदस्य दशरथ अर्जुन सपकाळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करून ग्रामसेवक प्रविण कोळी यांना सांगीतले की मला विचारल्या शिवाय तुम्ही कोणतेच ग्रामपंचायतचे काम करू नका असे बोलुन टेबलावरील रजिस्टर बाजुला फेकुन दिले व ग्रामसेवक करीत असलेल्या शासकिय कामात अडथळा आणुन कामकाज बंद केले.[ads id="ads2"]
यावर ग्रामसेवक प्रविण कोळी हे त्यास बोलण्यास गेले असता ग्रामपंचायत सदस्य दशरथ कोळी यांने शिवीगाळ करीत चापटा बुक्यांनी मारहाण केल्याची घटनासमोर आली असुन , याबाबत प्रविण कोळी यांनी फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने घटनेशी संबधीत ग्रामपंचायत सदस्य दशरथ सपकाळे याच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .


