कर्जोद ता.रावेर प्रतिनिधी (अजय तायडे) रावेर तालुक्यातील कर्जोद येथील भिम नगर समोर घाणीचे सम्राज्य ,ग्रामपंचायती चे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या तीन ते चार महिन्या पासुन येथे कचरा पळला असुन ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सरपंच यांचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष दिसुन येत आहे.[ads id="ads1"]
या मुळे दुर्गंधी पसरतांना दिसून येत आहे आणि लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. गावातील काही भागातील गटारी सुद्धा जिर्ण अवस्थेत आहे.
या कडे सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देईल का ? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहे.


