याबाबत रावेर च्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार रावेर तालुक्यातील ३६ गावांमध्ये १४२ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे १२३ हेक्टर,३५० गव्हू उत्पादकांचे २६२ हेक्टर ५२० मका उत्पादकांचे ४४४.२५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे. पण केळी नुकसानीबाबत प्रशासनाने अद्याप माहिती दिलेली नाही.[ads id="ads2"]
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीत रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक खुर्द,वाघाडी,शिंगाडी,रेन्भोटा,खानापूर.चोरवड,भोर,होळ,ऐनपूर, निंबोल,रावेर,वाघोड,कर्जोद,बोरखेडा,मोरगांव खुर्द,भोकरी,तामसवाडी,लालमाती,अभोडा बु,जिन्सी, के-हाळे,मंगरूळ,खिरवड,पातोंडी,पुनखेडे,थेरोळे,धुरखेडे,निंभोरासीम, बोह्रडे,अजनाड,नेहता,अटवाडे,दोधे,नांदूरखेडा,अजंदे या गावातील पिकांचे वादळाने मोठे नुकसान झाले आहे.
नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे तलाठी व महसूल कर्मचारी हे महाराष्ट्र व्यापी पेन्शन साठी संपात सहभागी असून देखील हि नैसर्गिक आपत्ती पाहून शेतकर्यांच्या मदतीला धावून आले आहे.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास सुरवात झाल्याची माहिती रावेर च्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी बोलतांना दिली