जळगाव जिल्हा प्रतीनिधी (हमीद तडवी) जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा कुसुंबा ता-रावेर येथे ग्रेडेड मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने नवनियुक्त ग्रेडेड मुख्याध्यापक यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! देण्यात आल्या. [ads id="ads1"]
याप्रसंगी दिलीप पाटील सर यांची आभोडे बु.,हबीब तडवी यांची मुंजलवाडी, अनिल महाजन यांची अहिरवाडी, महेंद्र लोंढे यांची कुंभारखेडा, मुस्ताक तडवी यांची केर-हाळे बु.1, येथे पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक साहेबू तडवी सर यांनी सर्वांचा सत्कार केला.यावेळी जितेंद्र नारखेडे,विजय गोसावी,दिपक कोंडे, विठ्ठल भुतेकर, कल्पेश पाटील,अरबीन तडवी, पत्रकार हमीद तडवी उपस्थित होते.


