जळगाव : पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना भुसावळ तालुक्यातील साक्री फाटा परिसरात असलेल्या शेतात घडली आहे. गोळीबारात अक्षय रतन सोनवणे (वय 26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (वय 24, भुसावळ) हे दोघे तरुण जखमी झाले आहेत.[ads id="ads1"]
भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळील एका शेतात दोघा तरुणांवर तीन संशयीतांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडत गोळीबार केला आहे. अक्षय रतन सोनवणे व मंगेश अंबादास काळे हे दोघे तरुण जखमी झाले असून त्यांना डोक्याला व पोटाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगेश व अक्षय आदी दुचाकीने जेवणासाठी निघाल्यानंतर साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळील एका शेतानजीक तरुणांवर हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडल्याने दोघे तरुण जखमी झाले.[ads id="ads2"]
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती तालुका पोलिसांना कळाल्यानंतर भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, भुसावळ तालुका निरीक्षक विलास शेंडे, सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे व तालुका पोलीस ठाण्याच्या सहकार्यांनी धाव घेतली. अक्षय सोनवणे या तरुणाला सुरूवातीला गोदावरीत हलवण्यात आले असून या तरुणाच्या पोटाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे तर दुसरा जखमी मंगेश काळे याच्या डोक्याला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती असून त्याच्यावरही गोदावरीत उपचार सुरू आहेत.