महामानवाच्या जयंतीनिमित्त कुसुंबे गावाने आदर्श घडविला : आमदार शिरीष दादा चौधरी यांचे गौरवोद्गार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

    छत्रपती शिवाजी महाराज,म. ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंतीनिमित्त कूसुंबे खुर्द ता. रावेर येथे सामाजिक एकता मिशन ग्रुप कुसुंबा खुर्द यांचे वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांचा पुरस्कार प्रदान समारंभ व सेवानिवृत्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता हा भव्य कार्यक्रम नुकताच कुसुंबा खुर्द येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी यांनी कुसूंबे गावाने महापुरुषांची जयंती वैचारिक पद्धतीने साजरी करून एक आदर्श घडविला असे गौरव उद्गार काढले. [ads id="ads1"]  

  या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अरुण दादा पाटील व लोकसंघर्ष मोर्चा नेत्या आदरणीय प्रतिभा ताई शिंदे, दर्जी फाउंडेशन चे संचालक मा. गोपाल दर्जी सर जळगांव , आरोग्य मंत्रालय मुंबई सेवानिवृत्त अवर सचिव मा. जमशेर समशेर तडवी , प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरेश चिंधू पाटील, तालुका अध्यक्ष वशिम शेख उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज,म. ज्योतीबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर व आदिवासी जननायक बिरसा मुंडा या महामानवाच्या प्रतिमांचे मान्यवरांचे हस्ते पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. [ads id="ads2"]  

 यावेळी चाळीस वर्षांपासून रुग्णसेवा करणारे डॉ. चंद्रकांत अग्रवाल, डॉ. संदीप चौरे, एम. पी. एस. सी . पास झालेले असलम जुम्मा तडवी (उप मुख्य कार्यकारी अधिकारी), पोलिस उपनिरिक्षक राजु भास्कर, डॉ. लोहित मदन महाजन. डॉ. दिपक आत्माराम महाजन, डॉ. गुणाल राजेंद्र महाजन, नेट सेट पास झालेले प्रा. देविदास यशवंत महाजन व प्रा. विवेकानंद महाजन, सी. ए. झालेले हर्षल यशवंत सपकाळ, आय. टी. इजि. तेजस मनोज पवार यांना जिवन संघर्ष पुरस्कार तसेच मा. कल्पेश पाटील सर व मा. दिलीप पाटील सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, तर अपंत्वावर मात करून स्वयंरोगारासाठी अनिता प्रेमचंद भालेराव व जहाबिर जहांनखा तडवी यांना जिवन संघर्ष पुरस्कार तर सामाजिक कार्यासाठी ममता मोहन चौधरी, मंगला संजय पाटील व सुरेखा संजय पाटील यांनाही नारीशक्ती पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. 

  आदिवासी गावातील मुले एवढ्या मोठ्या हुद्द्यार पोहचले आहेत याचा मला सार्थ अभिमान असल्याचे आदरणीय प्रतिभा ताई शिंदे यांनी म्हटले. यावेळी मा. गोपाल दर्जी सरांनी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या तरुणांना अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच मुबारक उखर्डू तडवी सर, उपसरपंच मुकेश पाटील, मुख्याध्यापक सायबु तडवी सर, मुख्याध्यापक एस. टी. महाजन सर नारायण घोडके, ग्रां. प. सदस्य सिंधुबई जयवंतराव जावळे, गफुर रुबाब तडवी, मैराज फिरोज तडवी, जुबेदा हसन तडवी, कल्पना अय्युब तडवी , हमीद बोंदर तडवी यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वि वितेसाठी माजी सरपंच अय्युब बशीर तडवी ग्राम पंचायत सदस्य प्रदिप सपकाळे, योगेश गोपाळ पाटील, जुम्मा हैतू तडवी, हमीद शावखा तडवी, रज्जाक जहांखा तडवी, प्रदिप महाजन, साहेबराव धनगर, सुनिल मकुंदा कावडकर, सुनिल पंडित महाजन, दीपक सुरेश भालेराव, निवृत्ती महाजन, डी. के. भालेराव, गोकुळ मुरलीधर भालेराव, गौतम गोविंदा भालेराव यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्रदिप सपकाळे यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!