मोरगाव खुर्द येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा ) तालुक्यातील मोरगाव खुर्द येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली .

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कांग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून जय घोषाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली . संपूर्ण गावातून मिरवणूक शांततेच्या वातावरणात काढण्यात आली . डिजेच्या तालावर युवकांनी जल्लोष साजरा केला . जयंती उर्त्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण वाघ उपाध्यक्ष धीरु तायडे , सचिव समाधान वाघोदे , रवि लहासे, सुकलाल लहासे , महेंद्र लहासे यांनी विशेष परीश्रम घेतले .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!