प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका यांच्या वतीने रावेर पंचायत समिती येथे ग्राम विस्तार अधिकारी यांना निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय बच्चुभाऊ यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रहार जनशक्ती चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी यांच्या आदेशाने तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने व प्रहार शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश चिंधू पाटील. यांच्या उपस्थितीत प्रहार दिव्यांग उपजिल्हाध्यक्ष दीनेश सैमिरे. प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष विनोद कोळी यांच्यातर्फे रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसंदर्भात काल दिनांक 17/04/2023 या रोजी रावेर येथील पंचायत समितीमध्ये ग्राम विस्तार अधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून उपोषणाचा इशारा देण्यात आला.[ads id="ads1"]  

   सन 2016 ते 2018 च्या शासन जी आर नुसार सर्व दिव्यांग बांधवांना तीन 3 %निधी वाटपाचा आदेश संबंधित ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना देण्यात आला होता पण अद्याप कोणताही निधी वाटप आजपर्यंत झालेला नाही.

   तसेच 2018 च्या शासन जीआर नुसार दिव्यांग यांना 5% निधी आणि 50% घरपट्टी माफीचा जीआर आला. परंतु सन 2016 पासून ते सन 2023 पर्यंत रावेर तालुक्यातील 80 %टक्के दिव्यांग बांधव त्यांच्या हक्काच्या फायद्यापासून आजपर्यंत वंचित आहेत.[ads id="ads2"]  

   तसेच अंध अपंग व्यक्ती 40% च्या वर यांना व्यवसायासाठी तत्सम जोडधंदे इत्यादी करणार असतील तर त्यांना 200 चौरस फूट जमीन, महाराष्ट्र जमीन महसूल( सरकारी जमिनीचे वितरण) नियम 1971 च्या नियम 31 मधील तरतुदीनुसार एक खास बाब म्हणून या आदेशामध्ये नमूद केलेल्या सवलतीची (कब्जे हक्काची) किंमत आकारून कब्जा हक्काने किंवा सवलतीच्या दराने होणारे भुईबाडी आकारून भाडेपट्ट्यावर मंजूर करण्यात यावी असे निवेदन पत्र,

  प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुक्याच्या वतीने गटविकास अधिकारी यांना दिनांक05/09/ 2022 या रोजी दिले होते. परंतु गटविकास अधिकारी यांनी कामचुकारपणामुळे दिव्यांगां च्या मागण्या 6 महिने प्रलंबित ठेवल्या त्याच्यावर कोणताही निकष काढला नाही.

   त्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका यांनी दिनांक 04/04/2023 या रोजी रावेर पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांना परत स्मरणपत्र देण्यात आले. तरी मॅडम यांनी दिव्यांग बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.

   रावेर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या हक्कांच्या मागण्या जसे की5% निधी, 50 % घरपट्टी माफ, व्यवसायासाठी 200 चौरस फूट जागा लवकरात लवकर मिळावी यासाठी परत प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुक्याच्या वतीने ग्रामविस्तार अधिकारी यांना उपोषणाचा इशारा दिनांक 4 /4/ 2023 या रोजी देण्यात आला.

   त्या ठिकाणी उपस्थित प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश चिंधू पाटिल,प्रहार दिव्यांग उपजिल्हाध्यक्ष दीनेश सैमिरे, प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष विनोद कोळी, प्रहार दिव्यांग तालुका सचिव भागवत शेलोळे, तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष वसीम शेख, दिव्यांग तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील, दिव्यांग तालुका उपाध्यक्ष जितेंद्र कोळी इत्यादींची उपस्थिती त्या ठिकाणी होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!