रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ९५.६२ टक्के मतदान,अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतदान पेट्यांमध्ये सिलबंद, आज होणार मतमोजणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)

 रावेर येथील कृषी  उत्पन्न बाजार समितीला ९५.६२ टक्के मतदान झाले.यावेळी अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतदान पेट्यांमध्ये सिलबंद झाले आहे. तिन पॅनल मध्ये झालेल्या निवडणुकीत मध्ये महाविकास तर्फे आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील तर भाजपातर्फे खासदार रक्षा खडसेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २ हजार ६५२ मतदारांपैकी दोन हजार ५३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.[ads id="ads1"] 

        रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडी पुरुस्कृत शेतकरी विकास पॅनल भाजपा-सेना पुरुस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनल जनशक्ती प्रहार पुरस्कृत परीर्वतन शेतकरी पॅनल तिन पॅनलसह अपक्षांमध्ये १८ जागांसाठी ५१ उमेदवारांमध्ये लढत होती.येथील यशवंत विद्यालयात सात बूथ वर मतदान घेण्यात आले. यासाठी व्यापारी २ सोसायटी २ ग्राम पंचायत २ हमाल मापाडी १ असे एकूण सात मतदान केंद्रावर मतदान पार पडले. [ads id="ads2"] 

  २ हजार ६५२ मतदारां पैकी २ हजार ५३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सोसायटी मतदार संघात ७४६ पैकी ७२७ मतदान झाले ९७.४५ टक्के त्यानंतर व्यापारी मतदार संघात एकूण ७६३ पैकी ७०५ मतदान झाले ९२.३९ टक्के तसेच हमाल मापाडी २३४ पैकी २२६ मतदान झाले ९६.५८ तर ग्राम पंचायत मतदार संघात ९०९ पैकी ८७८ मतदान झाले ९६.५८ टक्के आज सकाळी  ८ वाजे पासुन ७ टेबलवर मतमोजणी सुरुवात होणार आहे. रावेर शहरतील स्वामी विवेकानंद शाळेत एकूण १४ कर्मचारी सात टेबलांवर मतमोजणी करणार आहे.

हेही वाचा:- जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस/गारपीट च्या पार्श्वभुमीवर जळगाव जिल्हाधिकारी यांनी केले "हे" आवाहन

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!