रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील वाघोदा बु (Waghode Bk Taluka Raver) येथे दुचाकीचा कट लागल्यानंतर वाहन बघून चालवा, असे तक्रारदाराने म्हटल्याचा संशयीताला राग आल्याने त्याने मारहाण करीत शिविगाळ केली तसेच मारहाणीत नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. सदर ही घटना रावेर तालुक्यातील वाघोदा बु गावातील रमाई नगर गेटजवळ(Ramai Gate,Waghode Bk Taluka Raver) सोमवार दिनांक 24 रोजी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास घडली.
एकाविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी शामदास सुपडू तायडे वय - 29 रा.रमाईनगर, वाघोदा बु यांच्या तक्रारीवरून गंभीर बन्सी वाघ (वाघोदा) याच्याविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजीव एकनाथ चौधरी करीत आहेत.
हेही वाचा:- जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस/गारपीट च्या पार्श्वभुमीवर जळगाव जिल्हाधिकारी यांनी केले "हे" आवाहन


