चि.विराज पाटील यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विरवली येथील जि.प. शाळेला संगणक भेट : रा.काँ.पदाधिकाऱ्यांच्या स्तुत्य उपक्रम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल (सुरेश पाटील)

तालुक्यातील विरावली गावातील रहिवासी ॲड. देवकांत पाटील यांच्या मुलगा विराजचा पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन  गावातील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आजच्या अत्याधुनिक युगात अति आवश्यक असणारे संगणकाची गरज ओळखून वाढदिवसाला केक,जेवण इतर अनावश्यक खर्च न करता शाळेला संगणकाचा सेट भेट दिला.[ads id="ads1"]  

  या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष यांनी आपल्या मनोगता मध्ये ॲड.देवकांत पाटील हे नेहमीच विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी यावेळीही आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसा निमित्ताने जिल्हा परिषदेतील गावातील शाळेला संगणक भेट देत आहे असे सांगत विराजला जन्म दिवसाच्या शुभेच्छा रुपी आशिर्वाद दिले,   याप्रसंगी शाळेच्या उपशिक्षिका इंगळे मॅडम व शाळेतील विध्यार्थ्यांनी पाटील कुटुंबाने दिलेला संगणक स्वीकारला.[ads id="ads2"]  

   या कार्यक्रमाला देवकांत पाटील यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अजय पाटील स्वराज्य फोटो स्टुडिओचे संचालक हेमराज पाटीलभाऊ,गोलू माळी,विनोद पाटील, विरावली विकास सोसायटीच्या व्हा.चेअरमन नरेंद्र सोनवणे,प्रल्हाद पाटील,संजय पाटील लीलाधर सोनवणे,पवन पाटील,गिरीश पाटील, आदींची याप्रसंगी उपस्थिती होती संगणकाची भेट मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने इंगळे मॅडम यांनी देवकांत पाटील व त्यांच्या परिवाराचे आभार मानले .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!