यावल पोलिसांच्या साक्षीने नगरपरिषद प्रशासनाचे निघाले बौद्धिक दिवाळे : सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर चिकन पिवळ्या मातीचा झाला गारा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) यावल पोलीस स्टेशन समोर खराब झालेल्या रस्त्यावर यावल नगरपालिका प्रशासनाने बुद्धीचा वापर न करता चुकीचा निर्णय घेऊन बारीक कच न टाकता पिवळी माती टाकल्याने तसेच आज दुपारी चार वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस झाल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिवळ्या मातीचा गारा झाल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला.यामुळे यावल नगरपालिकेच्या बोगस  कारभाराबाबत नागरिकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.[ads id="ads1"] 

   यावल शहरात बुरुज चौका पासून यावल पोलीस स्टेशन समोरून सातोद,कोळवद, वड्री,परसाडे रस्ता मोठ्या प्रमाणात सार्वजनिक  वापराचा रहदारीचा रस्ता आहे,या ठिकाणी सातोद कडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर नगरपालिकेच्या पाण्यामुळे रस्ता खराब झाला होता त्या ठिकाणी खडी टाकलेली होती,या खडीमुळे दुचाकी व वाहनधारकांना, पायदळ चालणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.५ ते ६ दिवसापूर्वी याच रस्त्यावर मरीमातेच्या नावाने बारा गाड्या ओढल्या गेल्या त्यावेळेस नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून यावल नगरपालिकेने त्या खडीवर बारीक कच न टाकता पिवळी माती टाकली.[ads id="ads2"] 

  त्यात आज शुक्रवार दि. 28 आठवडे बाजाराचा दिवस आणि याच रोडवर पुढे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान केंद्र असल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक होती त्यात संध्याकाळी चार वाजता पाऊस सुरू झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टाकलेल्या पिवळ्या मातीचा गारा झाला त्या ठिकाणाहून दुचाकी वाहने व पायदळ येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली, पाच-सहा दिवसापूर्वी बारा गाड्या ओढल्या त्यामुळे एक दिवस आधी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावरील खडीवर बारीक कच टाकण्याऐवजी पिवळी माती टाकण्याचा चुकीचा निर्णय यावल नगरपरिषदेने घेतल्याने यावल नगरपरिषद प्रशासनाचे बौद्धिक दिवाळे निघाले आहे का ? आणि हे बौद्धिक दिवाळे यावल पोलिसांच्या साक्षीने निघाल्याने सार्वजनिक वापराच्या ठिकाणी अडथळा निर्माण झाल्याने पोलीस स्वतः फिर्यादी होऊन काही कारवाई करणार आहेत का..? असा प्रश्न उपस्थित केला जात असून त्या ठिकाणी यावल पोलिसांनी सार्वजनिक वापराचा रस्ता लक्षात घेता यावल नगरपालिके मार्फत त्या जागेवर बारीक कच टाकण्याची कारवाई तात्काळ करावी असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

हेही वाचा :- यावल येथील मतदान केंद्रावर आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थितीत उमेदवार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक : परंतु मतदान प्रक्रिया शांततेत

हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर :  जनधन बँक खाते  असेल तर मिळणार "इतके" रुपये

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!