मजुर भोला श्रीकुसूम पटेल (रा. सानीकावा जि. सिवान बिहार) आणि अभियंता चंद्रकांत वाभळे (वय-५२ रा.चाळीसगाव ह.मु. पुणे) असे मृतांचे नावे आहेत.
जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील (Jalgaon-Aurangabad High Way) चिंचोली गावाजवळ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकामाचा कंत्राट पुण्यातील न्याती कन्स्ट्रक्शन या खासगी कंपनीला देण्यात आला आहे. अनेक दिवस बंद असलेल्या या बांधकामावर गेल्या जानेवारीपासून कामाला सुरवात झाली आहे.[ads id="ads2"]
या ठिकाणी कंपनी अंतर्गत काही बिहार (Bihar) राज्यातील मजूर दोन महिन्यांपासून कामावर आहेत. गुरुवार (ता. २७) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळापासून जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत मजुरांनी सुरवातीला पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला. परंतु वादळाचा वेगापुढे पत्र्याचे शेड तग धरू शकले नाही. शेड उडून गेल्यावर भेदरलेले मजूर मैदानात उभ्या कंटेनरच्या दिशेने जीव वाचविण्यासाठी धावले.
हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश
हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर : जनधन बँक खाते असेल तर मिळणार "इतके" रुपये
हेही वाचा:- 60 वर्षीय वृद्धास लक्झरीने चिरडले ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना
कंटेनरच्या बाजूला मजुरांनी आडोसा घेतला असतानाच वादळात उभे कंटेनर उलटले. यात भोला श्रीकुसूम पटेल (रा. सानीकावा जि. सिवान बिहार) आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२ रा.चाळीसगाव ह.मु. पुणे) हे दोघे दाबले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेला अफरोज आलम (वय-२३ रा. कुंडाळे जि. पुरण्या बिहार) हा मजूर जखमी झाला. जखमीला तातडीने जळगावला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
क्रेन बोलावून काढले मृतदेह
कंटेनर उलटल्याची बातमी मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांना सुरवातीला अपघाताची शंका आली. मात्र, विस्तृत माहिती कळताच पोलिस पथकाने चिंचोलीच्या दिशेने धाव घेतली. कंटेनर खाली गाडले गेलेल्या दोघा मजुरांचा क्रेनच्या मदतीने कंटेनर उचलून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
कुटुंबीयांचा आक्रोश
मयत भोला हा गेल्या दोन महिन्यांपासून कंत्राटी पद्धतीने कामाला लागला होता. बिहार राज्यातील सिवान गावातील काही मित्रांसोबत तो पुण्याच्या न्याती कन्स्ट्रक्शन येथे कामासाठी आला होता. कंपनीने त्याला चिंचोली येथील साइटवर रवाना केल्याने तो, इतर मजुरांसह साइटवरच राहून काम करत होता.
त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. चंद्रकांत वाभळे अभियंता पदावर न्याती कंपनीत नोकरीला होते. गेल्या १५ दिवसांपासून या ठिकाणी कामावर हजर झाले होते. दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत (MIDC Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


