कोरपावली ता.यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
केंद्र शासनाने नविन शिक्षण प्रणाली या स्टार्स प्रकल्पाला समाविष्ट केलें आहे, त्याचं अनुष्णगणे प्रथम एज्यूकेशन फाऊंडेशन महाराष्ट्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमान यावर्षी पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळापूर्व अभियान राबविण्यात सुरूवात झाली असून त्याचं अनुषंगाने कोरपावली येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेत शाळा पुर्व अभियान राबविण्यात आले असून अभीयानात शाळा स्तरावर पहिली वर्गात दखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.[ads id="ads1"]
त्यामध्ये विद्यार्थ्याच्या विविध प्रकारच्या क्ष मता तपासल्या जाणारं आहेत, ज्य क्षमतांमध्ये त्यांना ज्या मदतीची गरज आहे त्या क्षमतांमध्ये पुढील दोन महिन्यात आई द्वारे घरीच मार्गदर्शन होऊन वाढ करण्यात येणार आहे याबाबत पालकांचे समुदेशन करण्यात येणार आहे यामध्येच पालक आई-वडील हेच विद्यार्थ्यांचे शिक्षक होणार असून शाळांमध्ये शिक्षक अंगणवाडी सेविका स्वयंसेवक केंद्रप्रमुख तालुका जिल्हा पर्यवेक्षक यंत्रणा त्या बालकाकडे वेळोवेळी भेट देणार असून[ads id="ads2"]
व मार्गदर्शन करणार येणारं असून या पद्धतीने विद्यार्थ्यांची पूर्व तयारी करून पुढील सत्रासाठी त्यांना पहिली वर्गात दखल करण्यात येणार आहे , कार्यक्रमा अंतर्गत सरपंच विलास अडकमोल, मुख्यधापक कोळी, शिक्षक निवृत्ती भिरूड, रमेश काळे, आदिल शाह, भरत चौधरी, सर्फराज तडवी, सलीम तडवी, उर्दू शिक्षक स्टॉप, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सह बहुसंख्य नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित होते.


