यावल ( सुरेश पाटील)
यावल येथील नितीन सोनार याने सेवानिवृत्त कंडक्टर तथा वाहक रामभाऊ सोनवणे यांस यावल एस.टी.स्टँड आवारात बोलावून चिथावणी देऊन यावल येथील पत्रकार सुरेश पाटील याच्या मोबाईलवर सोनवणे यांनी त्याच्या मोबाईलवरून कॉल करून यावल बस स्टॅन्ड आवारात बोलावून सोनवणे यांच्याकडून मारहाण व शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पत्रकारीता करू देणार नाही.[ads id="ads1"]
तसेच कुठेही माहितीचा अधिकार अर्ज करू देणार नाही अशी दमदाटी केल्याच्या कारणावरून तसेच सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली असल्याने दोघांविरूध्द पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हादाखल करणे.[ads id="ads2"]
संदर्भात तसेच ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांवर अन्याय होऊ नये म्हणून स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी आज दि. 11 रोजी अकरा वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याकडे जळगाव येथील वरिष्ठ पत्रकार तथा व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष सुरेश उज्जैनवाल,दैनिक साईमतचे संपादक प्रमोदभाऊ बराटे, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र नवाल गेले असता पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.