नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील नांदगाव शहरापासून जवळच असलेल्या मनमाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची रजिस्टर नंबर 42 / 2023 सीआरपीसी 174 मधील एक अनोळखी पुरुष जातीच्या प्रेताची नोंद करण्यात आली असून सदर व्यक्तीच्या वारसांनी व ओळखणाऱ्या व्यक्तींनी मनमाड शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याबाबत आव्हान करण्यात आले आहे.[ads id="ads1"]
नांदगाव तालुक्यातील जवळ असलेल्या मनमाड शहर पोलीस ठाणे कडील रजिस्टर नंबर 42/2023 सीआरपीसी 174 प्रमाणे दिनांक 28 मे 2023 रोजी रविवारी दुपारी 13 : 28 वाजता दाखल असून यातील खबर यांनी समक्ष मनमाड शहर पोलीस स्टेशनला येऊन खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर अकस्मात मृत्यूमधील अनोळखी मयत पुरुष जातीचे प्रेत वय वर्ष अंदाजे 50 ते 55 असून रंगाने सावळा, डोक्यावर लांब काळे पांढरे केस वाढलेले, डोळे अर्धवट उघडलेले, चेहरा उभट दाढी वाढलेली, अंगात निळे रंगाचा टी-शर्ट व विटकरी रंगाची पॅन्ट, शरीरबांधा सडपातळ, उंची168 सेमी, पायात काळा रंगाची चप्पल, शरीर अशक्त झालेले अशी अनोळखी प्रेत आहे.[ads id="ads2"]
तरी सदर अकस्मात मृत्यू मधील अनोळखी पुरुष जातीचे प्रेतास ओळख पटवणाऱ्या आणि ओळखणाऱ्यानी मनमाड शहर पोलीस ठाणे फोन 02591222920, मनमाड शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी मोबाईल नंबर 8805907900, तपासी अधिकारी पो.ना.1586 बी.पी.कोते मोबाईल नंबर 8308205200 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन मनमाड शहर पोलीस ठाणे यांनी केले आहे.



