वैशाली ताठे यांना सन 2023-2024 चा महाराष्ट्र शासनाचा ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून सन 2023-2024 चा सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी व  योगदानाबद्दल ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सहीचे गौरव पत्र कुंभारखेडा ग्रामपंचायतींच्या विद्यमान सदस्य सौ वैशाली विलास ताठे यांना सन्मानित करण्यात  आले. [ads id="ads1"] 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे मानकरी सौ वैशाली ताठे ग्रामपंचायत सदस्य कुंभारखेडा यांना गौरव पत्र व सन्मान चिन्ह कुंभारखेडा ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक सौ रुपाली ताई पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.[ads id="ads2"] 

  या प्रसंगी सरपंच भरत बोंडे, उपसरपंच माधव चौधरी,  भास्कर बोंडे यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी उपस्थित होते. या गौरवास्पद पुरस्काराचे मानकरी सौ वैशाली ताठे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा : 5 महिन्याच्या चिमुकल्यासह महिलेने विहीरीत उडी घेऊन संपवली जीवन यात्रा ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना



#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!